Ganesh Chaturthi 2022 : नांदेडमध्ये दोन चिमुकलींनी साकारला सोशल मीडिया बाप्पा; पाहा फोटो
सध्याच्या युगात व्हाट्सअप, ट्वीटर, फेसबुक या सोशल मीडिया साईट्सचा सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदैनंदिन जीवनातील अगदी छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आपण सोशल मीडियावर अवलंबून असतो.
कोरोना काळात तर विद्यार्थ्यांचं शिक्षणही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलं. याच सोशल मीडियाचा वापर करत नांदेडमधील दोन चिमुकलींनी सोशल मीडिया बाप्पा साकरला आहे.
नांदेड शहरातील साईबाबा कमान कौठा येथील रहिवासी उमेश ओझा यांच्या सातवी आणि सहावी वर्गात शिकणाऱ्या त्यांच्या दोन चिमुकल्या मुली, दरवर्षी गणपती समोर नवनवीन संकल्पना वर आधारीत देखावा साकारतात.
यात यंदाच्या वर्षी त्यांच्या कन्या तनिष्का आणि समीक्षा यांच्या संकल्पनेतून सोशल मीडियावर आधारित व्हाट्सअप्प चॅटिंगचा सुरेख असा देखावा साकारण्यात आला आहे.
या दोघीही मुली गुजराती हायस्कूल येथे शिक्षण घेत असून दरवर्षी कालानुरूप बदलांवरील देखावा साकारण्याची त्यांची प्रथा आहे.
सध्याच्या काळात व्हाट्सअप्पचा वापर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक करीत आहेत. यामुळे या विषयावरील देखावा साकारण्यात आल्याचे तनिष्का ओझा हिने सांगितले.