PHOTOS : रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत नागपुरात विविध उपक्रम
अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (RTO) रस्ता सुरक्षा विषयी - जसे की हेल्मेट, सीटबेल्ट,ओवरस्पीडिंग, वाहन चालविताना मोबाईलचा वापर न करणे व अपघात समयी मदत करणे आदी विषयांवर प्रबोधन व चर्चा करण्यात आली तसेच उपस्थितांच्या शंकांचे निराकरण करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस ला 'रिफ्लेक्टिव टेप' लावण्यात आले.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (ग्रामीण) येथे रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत प्रादेशिक परिवहन अधिकारी. विजय चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये नेत्र तपासणी शिबीरची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूरचे मोटर वाहन निरीक्षक श्री अमित कराड, श्री रवींद्र राठोड, श्रीमती मंजुषा भोसले व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री ध्वज दखने तसेच डॉ. शशिकांत शंभरकर, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा व सुषमा बाणिक, मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर मंडळ हे उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयात परवाना काढण्यासाठी आलेल्यांची नेत्रतपासणी करण्यात आली.
रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर यांचेमार्फत मोरभवन, एस.टी. बस स्टँड येथे रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
एसटी महामंडलाच्या डेपोमधील कर्मचाऱ्यांमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत जनजागृती करण्यात आली.
रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त शहर प्रादेशिक परिवहन कार्यालय शहर (MH31) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व वाहन चालक यांच्याही कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.