'द ब्रेल मॅन ऑफ इंडिया' स्वागत थोरात यांच्या चमूद्वारे नागपुरात दृष्टिहीनांसाठी प्रशिक्षण

द ब्रेल मॅन ऑफ इंडिया म्हणून प्रख्यात स्वागत थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रोटरी इशान्यतर्फे दृष्टिहीनांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

रोटची इशान्यच्या स्वयंसेवकांच्यावतीने दृष्टिहीनांबद्दल जनजागृतीही करण्यात आली.

1/9
कार्यशाळेत सहभागी दृष्टिहीनांना इतर ज्ञानेंद्रियांचा वापर करून तृणधान्ये, धान्ये आणि भाजीपाला ओळखणे, वर्दळ असताना रस्ता ओलांडणे आदींचे प्रशिक्षण देण्यात आले.
2/9
विविध आवाज ओळखणे हा देखील कार्यशाळेचा एक भाग होता. लाभार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचे त्यांच्या काळजी घेणाऱ्या स्वयंसेवकांचेही यावेळी आयोजकांनी आभार मानले.
3/9
सीताबर्डी येथील माहेश्वरी पंचायत भवनच्या सहकार्याने आयोजित कार्यशाळेत सहभागींना परिसरातील रस्त्यांवर छडीच्या सहाय्याने सतर्कतेने चालण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
4/9
पांढऱ्या छडीचा शास्त्रीय पद्धतीने वापर कसा करायचा, 2-पॉइंट तंत्र कसे वापरायचे आणि पायऱ्या चढताना छडी पकडण्यासाठी पेन्सिल ग्रिप असे विविध तंत्रे शिकवण्यात आली.
5/9
कार्यशाळेसाठी रोटरी इशान्यचे शहरातील शेकडो स्वयंसवेकांनी आपला पूर्णवेळ देऊन प्रशिक्षणार्थ्यांना मदत केली.
6/9
या दोन दिवसीय कार्यशाळेत सहभागी विविध संस्थांच्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती.
7/9
कार्यशाळेची सुरुवात समूह राष्ट्रगीत गायनाने झाली. राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने परिसरातील उर्जा संचारली होती.
8/9
स्वयंसेवक आणि कार्यशाळेतील सहभागी दृष्टीहीनांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
9/9
दृष्टिहीनांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने 'द ब्रेल मॅन ऑफ इंडिया' म्हणून प्रख्यात स्वागत थोरात यांच्या चमूने सहभागींना प्रशिक्षण दिले.
Sponsored Links by Taboola