PHOTO : पर्यावरण दिनानिमित्य नागपुरातील पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्पर्धा आणि प्रदर्शनाला नितीन गडकरींची भेट
आगामी गणेशोत्सवात मूर्तिकारांनी मातीच्याच मूर्ती बनवाव्या आणि ग्राहकांनी देखील मातीच्याच मूर्तीं खरेदी कराव्यात, असे मत केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजागतिक पर्यावरण दिनानिमित्य नागपुरातील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण पूरक गणेशमूर्ती स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नागपुरात आज पर्यावरण पूरक गणेशमूर्ती स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या काही कलाकारांना आणि मूर्तिकारांना यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते सम्मानित करण्यात आले.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे निर्माण होणारे पर्यावरणाचे प्रश्न लक्षात घेता येणाऱ्या गणेशोत्सवात आपण सर्व मूर्तिकारांनी मातीच्याच मूर्ती बनवाव्या आणि ग्राहकांनी ही मातीच्याच मूर्तीं खरेदी कराव्या असे गडकरी यांनी म्हटले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तिकारांचा दबाव वाढतो. ते त्यांच्या व्यवसायाचे काय होणार असे मुद्दे पुढे करतात. मात्र, पर्यावरणाची काळजी करणाऱ्या मूर्तिकारांनी त्यांच्या दबावात न येता फक्त मातीच्याच मूर्ती बनवण्याचे संकल्प करावे आणि ग्राहकांनी ही मातीच्याच मूर्ती घेऊन घरी स्थापन करण्याचे संकल्प करावे असे आवाहन गडकरी यांनी केले. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांना मातीच्या मूर्ती कलेकडे वळवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रयत्न करावे असे ही गडकरी म्हणाले.
आजच्या स्पर्धात्मक काळात कलेच्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर त्या कलाकाराची कला आणि डिझाईन उत्तम असणे आवश्यक आहे. कलाकारांना त्यांच्या मुर्त्या आणि इतर कलाकुसरीसाठी कच्चा माल, माती मोफत मिळाली तर उत्तम होईल. ज्या पद्धतीने सध्या शेतकऱ्यांच्या उत्पादनांना बाजार मिळवून देत त्याची विक्री व्यवस्था सांभाळणाऱ्या अनेक कंपन्या तयार झाल्या आहेत. तसेच एखादी कंपनी मूर्तिकार आणि त्यांच्या मुर्तीकलेला प्रोत्साहन आणि बाजार मिळवून देण्यासाठी तयार झाली तर ग्रामीण भागातील कलावंतांना फायदा होईल असे गडकरी यावेळी म्हणाले.