In Pics : नागपुरात दुचाकी अन् कार चालक पोलिसांच्या रडारवर; बेशिस्त ऑटो चालकांवर मेहरनजर
जनता चौकात ऑटो चालकाकडून भर रस्त्यात प्रवाशांची चढ-उतार करण्यात येते. त्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहरातील इतर चौकांप्रमाणे जनता चौकाच्या चारही दिशेने ऑटो स्टॅन्ड नसताना ऑटो रस्त्यातच उभी करण्यात येतात.
झाशी राणी चौकाच्या मुख्य चौकातच ऑटोचालक आपले ऑटो उभे करुन प्रवासी शोधण्यासाठी फिरत असतात. मात्र यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो.
झाशी राणी चौकातच वर्दळीच्या ठिकाणी पूर्ण रोड बेशिस्त ऑटोचालकांमुळे ब्लॉक करण्यात येतो.
वाहतूक पोलिसांचा धाक नसल्याने शहरात सर्वत्र ऑटोचालक रस्त्यातच वाहन उभे करुन प्रवाशांचा शोध घेत असतात.
सामान्य नागरिकाने आपली दुचाकी किंवा कार एक मिनीट जरी नो पार्किंगमध्ये उभी केली तर लगेच वाहतूक विभागाद्वारे त्यावर कारवाई करण्यात येते. मात्र ऑटोचालकांवर कारवाई करण्याची हिंमत या पथकाकडून दाखवण्यात येत नाही.
एकीकडे रस्त्यावरील फेरीवाल्यांनी फुटपाथ गिळंकृत केले आहे. तर दुसरीकडे बेशिस्त ऑटोमुळे रस्ता रुंद झाला आहे. त्यामुळे पायी चालणाऱ्यांना चांगलाच त्रास होतोय.
सीताबर्डी येथील मुख्य मार्गावर उड्डाणपुलाखाली चौकात वाहतूक पोलीस उभे असतानाही ऑटो चालकांकडून रस्त्यातच ऑटो उभे करण्यात येत आहेत.
फेरीवाले आणि बेशिस्त ऑटोचालकांसाठी नियम नाहीत का? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
शंकरनगर मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजू ऑटोचालकांनी ताब्यात घेतल्या असून पोलिसांच्या समोरच ऑटो उभे करुन प्रवासी शोधले जात आहेत.