पाहा फोटो: कौतुकास्पद! राजभवनात पक्ष्यांसाठी सुरू झालाय बर्ड कॅफे
महाराष्ट्रात अत्यंत देखणी अशी राजभवनांची परंपरा लाभली आहे. नागपूरच्या अतिशय सुरेख आणि दिमाखदार राजभवनात आता एक आगळा वेगळा सृजनशील प्रयोग यशस्वी झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरातील राजभवनात 'बर्ड कॅफे' हा अनोखा सुरू करण्यात आला आहे.
नागपूरच्या ह्या राजभवनाच्या कॅफेमध्ये गुण्यागोविंदाने, मस्त एकत्र बसून खान पान करणारे पक्षी दिसत आहेत. मोर, पोपट, चिमण्या, खारुताई, नाकतोडे असे पक्षी या बर्ड कॅफेत दिसत आहेत.
जवळपास 100 एकरात पसरलेल्या नागपूरच्या राजभवनात हे कॅफे खास इथल्या पक्षी प्राण्यांसाठी सुरू करण्यात आले आहे.
विदर्भात प्रखर उन्हाळा असतो. उन्हाळ्यात पाहिजे तेवढे अन्न ह्या प्राणीमात्रांना मिळाले नाही तर? ह्या भावनेतून हा बर्ड कॅफे सुरू करण्यात आला.
सकाळी हा बर्ड कॅफे पाहणे पर्वणी असते. विविध प्रजातीचे पक्षी एकाच ठिकाणी वास्तव्य करत दिसते. राजभवनातील या आगळ्या वेगळ्या संकल्पनेचे कौतुक केले जात आहे.
राजभवनांची जबाबदारी असलेले रमेश येवले यांची ही संकल्पना आहे.
चक्क 164 प्रजातीचे पक्षी इथे आढळले. राजभवनाच्या आवारात मोरांची संख्याच 60 ते 70 असल्याचे येवले यांनी सांगितले. शहरी भागात असून सुद्धा ह्या परिसरात एवढी जैवविविधता राजभवनात असल्याचे आढळून आले आहे