Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळल्याने नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू, तर 11 जण जखमी

Nagpur Butibori MIDC Accident : नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसीमधील अवादा कंपनीत मोठी दुर्घटना घडलीय. यात प्रकल्पस्थळी उभारण्यात येत असलेला टँक टॉवर अचानक कोसळल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय.

Continues below advertisement

Nagpur Butibori MIDC Accident

Continues below advertisement
1/7
Nagpur Butibori MIDC : नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसीमधील अवादा कंपनीत मोठी दुर्घटना घडलीय. यात प्रकल्पस्थळी उभारण्यात येत असलेला टँक टॉवर अचानक कोसळल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय. तर या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून 11 इतर कामगार जखमी झाल्याची माहिती आहे.
2/7
घटनेतील जखमींवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे. अवादा कंपनीत सौर पॅनलनिर्मिती आणि त्यासंबंधित पायाभूत सुविधांचं काम सुरू होतं.
3/7
याच दरम्यान, उंच टँक टॉवरचे बांधकाम चालू असताना अचानक संपूर्ण टॉवर खाली कोसळला आणि मोठा आवाज झाला. या दुर्दैवी अपघातात आतापर्यंत तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 11 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे.
4/7
पाण्याच्या टाकी शेजारी कन्ट्रक्शन काम करणारे मजूर काम करत होते. याचवेळी पाण्याची टाकी कोसळ्याने त्याखाली काम करणारे मजूर दबले गेले आणि त्यात 3 मजुरांचा मृत्यू तर इतर जखमी झालेय.
5/7
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. तर दुसरीकडे जड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मलबा हटवण्याचे काम सुरू असून, अडकलेल्या मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Continues below advertisement
6/7
उंच टँक टॉवरचे बांधकाम चालू असताना अचानक त्याचा समतोल बिघडला आणि संपूर्ण टॉवर खाली कोसळला आणि मोठा आवाज झाला.
7/7
टॉवर कोसळताच परिसरात धूळ आणि मलब्याचे ढग पसरले, त्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
Sponsored Links by Taboola