MLA Photo Session : अध्यक्षांच्या उजव्या बाजूला दादा, डाव्या बाजूला मुख्यमंत्री, जयंत पाटीलही पहिल्या रांगेत, फोटोसेशनवेळी कोण कुठे दिसले?

Nagpur Winter Session : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस, विधानभवनात सर्वपक्षीय आमदारांचं फोटोसेशन, टाळी देऊन हास्यविनोद, गळ्यात पडून हसले,भिडणारे शिवसैनिक खेळीमेळीत दिसले

MLA Photo Session Nagpur Assembly Winter Session 2023

1/9
नागपूर: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Winter session) आजचा सहावा दिवस आहे.
2/9
मात्र आज सर्वपक्षीय आमदाराच्या एकत्र फोटोसेशनवेळी महाराष्ट्राच्या राजकीय प्रगल्भतेचं चित्र पाहायला मिळाले.
3/9
सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांचे हेवेदावे विसरुन, सर्व आमदार खेळीमेळीत पाहायला मिळाले.
4/9
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मध्यभागी तर त्यांच्या उजव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार, डाव्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहायला मिळाले.
5/9
आजही विधानसभेच्या सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र फोटोसेशन केले.
6/9
दरम्यान या फोटोसेशननंतर एकमेकांना भिडणारे ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्येही वेगळं चित्र पाहायला मिळालं.
7/9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू या दोघांमध्ये हास्यविनोद पाहायला मिळाले.
8/9
दोघेही एकमेकांना टाळ्या देऊन हसताना दिसले. त्यावेळी बाजूला देवेंद्र फडणवीस, आमदार संतोष बांगर उपस्थित होते.
9/9
टाळी देऊन हास्यविनोद, गळ्यात पडून हसले, भिडणारे शिवसैनिक खेळीमेळीत दिसले
Sponsored Links by Taboola