PHOTO : समृद्धी महामार्गाचा आरंभबिंदू रात्रीच्या वेळी कसा दिसतो?
राज्यातला सर्वात मोठा चौक आणि समृद्धी महामार्गाचा आरंभबिंदू रात्रीच्या वेळेला कसा दिसतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतब्बल 18 एकरात विस्तारलेला आणि सुमारे एक किलोमीटरची परिक्रमा असलेला समृद्धी महामार्गाचा झिरो माईल्स रात्री विविध रंगांच्या लाईट्सने आणखी सुंदर दिसतो.
या चौकाला समृद्धी महामार्गाची रांगोळी असे म्हटले गेले होते.
मात्र, रात्री विविध रंगांच्या लाईट्समुळे हा चौक खरोखरच अवाढव्य समृद्धी महामार्गाची प्रशस्त अशी रांगोळीच दिसते.
विशेष म्हणजे ह्या सर्व लाईट्स कोळसातून तयार केलेल्या विजेवर नसून झिरो माईल्स या चौकावर लावलेल्या सोलार ट्रीजमधून निर्माण होणाऱ्या सौरऊर्जेवर आहेत.
या चौकावरच आठ किलो वॅट सौर ऊर्जेचे रोज उत्पादन केले जाते.
समृद्धी महामार्गाच्या या आरंभबिंदूवर खास फसाड लाइट्स लावण्यात आले असून त्यासाठी 73 प्रकारच्या विविध रंगी विद्युत दिव्यांचा वापर करण्यात आला आहे.
चौकाच्या अवतीभवती 90 विद्युत पोल आणि दीड हजार पेक्षा जास्त विद्युत दिवे असून ते रात्रभर या चौकाला आकर्षक पद्धतीने प्रकाशमान ठेव