Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : नागपुरात 'हॅलोविन'चा माहोल; 'के-पॉप' सादर करणाऱ्या उदयोन्मुख तरुणांसाठी व्यासपीठ
'लीडर्स क्लब'च्या वतीने दोन दिवसीय 'हॅलोविन मार्कर्स फेअर 2.0'चे आयोजन सीताबर्डी येथील अमृतभवन येथे करण्यात आले आहे. या ठिकाणी कोरिअन गाण्यांचे प्रकार असलेल्या 'K-POP'च्या चाहत्यांसाठी शहरातील युवा कलाकार परफॉर्म करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कार्यक्रमात शहरातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या विविध स्टार्टअपचे स्टॉल्सही लावण्यात आले आहेत. प्रॉडक्ट डिझायनिंग तृतीय वर्षात शिकणाऱ्या मृणमयी देशपांडे हिने डिझाईन ड्यूओ नावाने येथे स्टॉल लावला असून येथे मृणमयी आय-फेस पेंटिंग, टीशर्ट पेटिंग करुन देत आहे.
आर्टिकेक्टचे शिक्षण घेतलेल्या वैदेही अपूलवार आणि कौतिक त्रिवेदी यांनी फ्लूड आर्ट, कस्टमाईज डायरी प्रदर्शनात ठेवली आहे.
फेअरमध्ये प्लेन हॅटवर विविध थीमवर आधारित डिझाईन केलेल्या हॅट्सही विद्यार्थ्यांनी डिस्प्लेवर ठेवल्या आहेत.
येथे यशाली आर्ट नावाने यशाली सोनकुसरे हिने आपल्या डिझाईन केलेल्या 'ऍनिमे आर्ट' कॅरेक्टर स्टॉलवर ठेवले आहे. ती इन्स्टाग्राम आणि वेबसाईटच्या माध्यमातून मांगा पॅनल्स या कंपनीसाठी कॅरेक्टर डिझायनिंगचेही प्रोजेक्ट करते.
बीएससी प्रथम वर्षात असणाऱ्या ध्रुव घोडमारे याने आपल्या तयार केलेल्या 'अॅनिमे आर्ट'च्या विविध फ्रेम्स याठिकाणी विक्रीसाठी ठेवल्या आहेत.
3D आणि VFX चे शिक्षण घेणाऱ्या युगंत गुजरमाल याने आपल्या 'अॅनिमे आर्ट'चे विविध कॅरेक्टर डिस्प्लेवर ठेवले असून तो जपान, अमेरिका, जर्मनी येथे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून विविध कंपन्यांना कॅरेक्टर डिझाईन देत असतो.
नागपुरातील कलावंत आणि स्टार्टअप्सला सपोर्ट करण्यासाठी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मित्रांसह येथे भेट देत असून नव-नवीन संकल्पना सादर करणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देत आहेत.
होम सायन्समध्ये बीएससीचे शिक्षण घेतलेली पारुल बेहेल हिने येथे विंटरवेअरचे स्टॉल लावले असून गेल्या सहा महिन्यातच तिने सुरु केलेल्या या स्टार्टअपला चांगला प्रतिसाद लाभत आहे.
फेस आणि आय आर्ट करणाऱ्या काही विद्यार्थिनींनीही येथे स्टॉल्स लावले असून त्यांना 'हॅलोविन स्पेशल लुक'साठी आपल्या पेंटिंग आर्टचा उपयोग करत आहे.
'अॅनिमे आर्ट'च्या चाहत्यांसाठी येथे तरुणांनी सुरु केलेले विविध स्टार्टअप एकाच छताखाली मिळत असून तरुणांनी तयार केलेल्या विविध कॅरेक्टरही बघण्यास मिळत आहेत.
याठिकाणी कॅरेक्टरचे प्रिंट, स्टिकर्सच नव्हे तर हॅण्डपेंटिंगने तयार केलेले टी-शर्टही तरुणांसाठी उपलब्ध आहेत.