Vijayadashami 2022 : पाऊस बरसला तरी नागपुरकरांचा जोश कायम, कस्तूरचंद पार्कवर पारंपारिक पद्धतीने रावण दहन
Dussehra 2022: साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणार्या दसऱ्याच्या दिवशी (विजयादशमी) आपट्याच्या पानांच्या रूपात 'सोनं' एकमेकांना देऊन हा सण साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी भगवान राम यांनी लंकापती रावणाचा वध करुन विजय मिळवला होता. तसेच या दिवशी रावणाचा पुतळा तयार करुन त्याचे दहन केले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरातील कस्तूरचंद पार्क येथे पारंपारिक पद्धतीने रावण दहनाचा कार्यक्रम पार पडला. मागिल 71 वर्षांपासून सनातन धर्म युवक सभेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. रावणाचा पुतळा दहन करताना नागपूरकरांनी वाइट गोष्टींचा अंत करुन उत्तम मार्गावर जाण्याचा संकल्प केला.
सायंकाळी पाऊस आल्याने काही काळासाठी कार्यक्रम खोळंबला होता. मात्र नागरिकांच्या उत्साहावर कुठलाही परिणाम झाला नाही. यावेळी हजारोंच्या संख्येत नागरिक मैदानावर उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे यंदाही सांस्कृतिक कार्यक्रमांसह रावण दहन पार पडला. दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या कार्यक्रमालाही सहकुटुंब नागरिकांची हजेरी लावली.