Nagpur Ganeshotsav : वृंदावनच्या श्री बाँकेबिहारी मंदिराची प्रतिकृती बघण्यासाठी भाविकांची गर्दी

संती गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी नागपुरकरांना वृंदावनच्या श्री बाँकेबिहारी मंदिराचे दर्शन घडवून आणण्यात येत आहे. यासाठी दारोडकर चौक परिसरात श्री बाँकेबिहारी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

नागपुरातील दारोडकर चौक परिसरात श्री बाँकेबिहारी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

1/9
श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळातर्फे यावर्षी नागपुरकरांना वृंदावनच्या श्री बाँकेबिहारी मंदिराचे दर्शन घडवून आणण्यात येत आहे. यासाठी दारोडकर चौक परिसरात श्री बाँकेबिहारी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
2/9
गणेशस्थापनेचे मंडळाचे यंदाचे 65 वे वर्ष असून मागिल पंधरा वर्षात नागपूरच नव्हे तर विदर्भात मंडळाने आपली ख्याती निर्माण केली असून मंडळाने यापूर्वी संत श्री गजानन महाराज मंदिर, शेगाव, जंग आझादीकी (1857 च्या संग्रामावर आधारीत देखावा) श्री साईबाबा मंदिर शिर्डी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर, तिरूपती बालाजी मंदिर, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर अक्कलकोट, आद्य ज्योतिर्लिंग मंदिर त्र्यंबकेश्वर, तुळजाभवानी मंदीर तुळजापुर सप्तश्रृंगी देवी मंदीर नाशिक, श्री खंडोबा मंदिर जेजुरी, श्री श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर पीठापुरम, श्री योगेश्वरी देवी मंदिर, अबेजोगाई, महाकालेश्वर मंदिर, उज्जैन, शारदादेवी मंदिर, मैहर, अष्टविनायक दर्शन इत्यादी सुप्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती तयार करून नागपूरात नव्हे तर संपूर्ण विदर्भात एक आपली विशेष व आगळीवेगळी ख्याती व ओळख निर्माण केलेली आहे.
3/9
यंदा दररोज संध्याकाळी 7.30 ते 10 पर्यंत इस्कॉनतर्फे (Iskcon Nagpur) भजन किर्तन व सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मंदिरात श्रीकृष्णाच्या अकरा प्रमुख लीलांचे चित्ररूप्रदर्शन सुद्धा याठिकाणी होत आहे.
4/9
फक्त प्रतिकृतीच नव्हे तर श्री बाँकेबिहारी यांची सकाळी व संध्याकाळी होणारी पारंपारिक आरती, रोज होणारा श्रृंगार आरती, प्रसाद/ भोग आदींद्वारे वृंदावन प्रमाणेच वातावरण निर्मितीकरुन करण्यात येत आहे.
5/9
मंडळाच्या या उपक्रमाला नागरिकांचाही उदंड प्रतिसाद लाभत असून वृंदावनच्या श्री बाँकेबिहारी मंदिराची प्रतिकृती बघण्यासाठी भाविक मोठ्या संख्येत दररोज उपस्थिती लावत आहेत.
6/9
या उत्सवादरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे.
7/9
या उत्सवादरम्यान लहान मुलांच्या विविध स्पर्धा जसे चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, महिलांसाठी उखाणे स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन तसेच एक दिवस रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात येत आहे.
8/9
मंडळाचे जवळपास 200 महिला व पुरूष स्वयंसेवक भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी सज्ज आहेत.
9/9
नागपुरकरांनी या मंडळाला एकदा आवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
Sponsored Links by Taboola