मुंबईत क्रिकेटचा फिव्हर, सागराशेजारी जनसागर; गर्दीमुळे मुख्यमंत्र्यांचा पोलिस आयुक्तांना फोन
क्रिकेटच्या पंढरीत विश्वविजय मिळवलेल्या टीम इंडियाचं आज सायंकाळी आगमन झालं. मात्र, तत्पूर्वीच मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. मुंबईच्या सागराशेजारी जनसागर उसळल्याचं पाहायला मिळालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वप्रथम मुंबई विमानतळावर अग्निशमन दलाच्यावतीने टीम इंडियाच्या विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात आला आहे. त्यानंतर, स्पेशल बसमधून टीम इंडिया मुंबईतील वानखेडे मैदानावर पोहोचत आहे.
वानखेडे मैदानावर टीम इंडियाच्या स्वागताला मोठी गर्दी झाली असून मैदान गच्च भरलं आहे. तर, वानखेडे मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा जनसागर उसळल्याचं दिसून येत आहे.
जिकडे तिकडे क्रिकेटप्रेमी आणि भारतीय संघाच्या स्वागताला जमलेले क्रिकेट चाहते दिसून येत आहेत. मुंबईतील मरीन ड्राईव्हवरील गर्दी पाहाता मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. मरीन ड्राईव्हकडे आता नागरिकांनी येऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे संनियत्रण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत.
जमलेल्या क्रिकेट प्रेमींचीही गैरसोय होऊ नये याकडे मुंबई पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, अनुषांगिक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दुरध्वनीद्वारे दिल्या आहेत.
मुंबईच्या गर्दीचा फिव्हर केवळ रस्त्यावरच नाही, तर धावत्या ट्रेनमध्येही दिसून येत आहे. मुंबई लोकलमध्ये मुंबईचा राजा, रोहित शर्मा.. अशी घोषणाबाजी केली जात आहे.
विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन पॉईंट ते स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये, म्हणून वाहतूक पोलीस कार्यरत झाले आहेत.