Ganeshotsav 2022: मुंबईत गणेशोत्सवाची धूम! पाहा मुंबईतील प्रसिद्ध गणपती
आज देशभरात गणेश चतुर्थी साजरी होत आहे. हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गणपतीच्या भक्तीत तल्लीन झालेले भक्त त्याच्यासाठी भव्य मंडपही सजवतात. यात मुंबईतील गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. यातीलच काही प्रसिद्ध गणपती मंडळ पाहूया...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLalbaugcha Raja 2022: लालबागचा राजा हा फक्त मुंबईतच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे. येथे 10 दिवस भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रेटीही या दिवसांत राजाच्या दरबारी हजेरी लावताना दिसतात.
Chinchokilacha Chintamani 2022: चिंचपोकळीचा चिंतामणी हे सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबईतील सर्वात जुन्या गणपती मंडळांपैकी एक आहे. या मंडळाला यंदा 103 वर्ष पूर्ण झाले आहेत.
Tejukaya Ganpati 2022: तेजुकाय मेन्शनचा राजा हा मुंबईत खूप प्रसिद्ध आहे. लालबाग परिसरात असलेल्या या मंडळात दरवर्षी हजारोच्या संख्येने भाविक दर्शनाला येतात.
Ganesh Galli Cha Raja 2022: लालबागचाच शेजारी असलेला गणेशगल्लीचा राजा हा मुम्बातील मनाच्या गणपती पैकी एक आहे.
Ganesh Galli Cha Raja 2022: गणेशगल्लीचा राजा यंदा विश्वकर्मारुपात पाहायला मिळत आहे.
Narepark Cha Raja 2022: लालबाग-परळमधील प्रसिद्ध गणपती मंडळांपैकी एक म्हणजे नरेपार्कचा राजा.
GSB Ganpati 2022: मुंबईतील वडाळ्यातील प्रसिद्ध जीएसबी गणपती.
khetwadi cha raja 2022: खेतवाडीचा राजा.