घरोघरी तिरंगा! उत्साहाला उधाण, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग, मंत्रालय गजबजलं
घरोघरी तिरंगा अभियान देशभरात चालवलं जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात घरोघरी तिरंगा अभियानानिमित्त कार्यक्रम आयोजित केला गेला.
कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री यांच्यासमवेत तिरंग्यासह सेल्फी काढून घेण्यासाठी एकच गर्दी उसळली होती.
मंत्रालयातील अधिकारी तसेच समस्त कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना अक्षरशः जणू घेरावच टाकला होता.
प्रत्येकाला मुख्यमंत्र्यांसमवेत तिरंगा ध्वज घेऊन सेल्फी काढायची होती.
मुख्यमंत्री देखील सर्वांच्या इच्छेला मान देत, प्रत्येकापाशी थांबत सेल्फी काढत होते.
यावेळी त्रिमूर्ती प्रांगणातले सगळे वातावरण तिरंगामय झालं होतं.
भारत माता की जय आणि जय हिंद अशा घोषणांनी मंत्रालय दणाणून गेले होते.
यावेळी मंत्रालय खचाखच भरलेले दिसून आले. मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.