Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कुर्ला ते विद्याविहार दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड, 35 मिनिटांनी वाहतूक पूर्ववत

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. कुर्ला ते विद्याविहार दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप करावा लागला. अखेर 35 मिनिटांनी सेवा पूर्वत झाली.

Continues below advertisement

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Continues below advertisement
1/5
मध्य रेल्वेची वाहतूक रात्री साडे दहाच्या दरम्यान विस्कळीत झाली असल्यानं धीम्या आणि जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली होती..
2/5
काही लोकल उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांचे हाल झाले. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची घोषणा स्टेशनवरुन केली जात होती. मात्र, सिग्नलमधील बिघाड कधी दुरुस्त होणार हे स्पष्ट झालं नव्हतं. मात्र, साधारण पणे सव्वा अकराच्या सुमारास सिग्नल यंत्रणा दुरुस्त झाली.
3/5
अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळं उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांची घाटकोपर स्थानकात मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
4/5
कुर्ला आणि विद्याविहार स्थानकादरम्यानच्या सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यात रेल्वेला 35 मिनिटांनी यश आलं.
5/5
अखेर सिग्नल यंत्रणा दुरुस्त झाल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरु झाली असून लोकल उशिरानं धावत असल्याचं पाहायला मिळालं.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola