Monochrome Photo Exhibition : कृष्णधवल छायाचित्रांचा अनोखा नजराणा; देशभरात टिपलेल्या फोटोंची नागपूरकरांना भुरळ
नागपूरात कृष्णधवल छायाचित्रांचा अनोखा नजराणा बघण्याची संधी उपलब्ध झाली असून देशभरात टिपलेल्या फोटोंची नागपूरकरांना भुरळ पडते आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफाईन आर्ट फोटोग्राफीच्या माध्यामातून प्रसिद्ध छायाचित्रकार विनय ठाकूर यांनी देशभरात टिपलेले अनेक कृष्णधवल छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले आहे.
हे प्रदर्शन बघण्यासाठी नागपूरकरांनी गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे.
नागपूरच्या चिटणवीस सेंटरच्या दालनात हे प्रदर्शन भरवण्यात आले असून हे प्रदर्शन नागरिकांसाठी मोफत खुले करण्यात आले आहे.
येत्या रविवार 5 जानेवारी 2025 पर्यंत हे प्रदर्शन नागरिकांना बघता येणार आहे.
अनेक विषयांवर टिपलेले ही कृष्णधवल छायाचित्र रंगांचे महत्व विषद करणारे आहेच शिवाय प्रत्येक छायाचित्र काही कहाणी सांगत असल्याचे प्रेक्षकांचे मत आहे.
कलरफुल्ल जगात रंगांचे महत्व सांगणारे हे छायाचित्र देशाचा अनेक भागात जाऊन टिपण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या प्रदर्शनाच्या ठिकाणी दररोज एक माहितीपूर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत असून त्यातून उपयुक्त माहिती आणि अनुभव सांगण्यात येत आहे.
हे प्रदर्शन नागपूरकरांसाठी मोठी पर्वणी ठरली असून नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन छायाचित्रकार विनय ठाकूर यांनी केलं आहे.