Pune Accident: मॅक्स ऑटो अन् आयशर टेम्पोचा भीषण अपघात; घटनास्थळीच 9 जणांचा मृत्यू, पुणे-नाशिक मार्गावरील घटना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jan 2025 01:02 PM (IST)
1
पुण्यातून (Pune Accident) भीषण अपघाताची एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने जोराची धडक दिली आहे.
3
पुणे-नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात(Pune Accident) झाला आहे.
4
तर या घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
5
पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ हा अपघात आज सकाळी दहाच्या सुमारास झाला आहे.
6
या अपघातात चेंडू प्रमाणे मॅक्स ऑटो पुढे फेकल्या गेल्याचे प्रत्यक्षदर्शीने संगीतल्याची माहिती आहे.
7
रस्त्यात एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याच एसटीवर जाऊन ही मॅक्स ऑटो आपटली.
8
यात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर तिघे जखमी आहेत.(Pune Accident)