Manoj Jarange : ट्रॅक्टर चालवत 20 तारखेच्या मुंबई आंदोलनाचा घेतला जरांगे यांनी आढावा!
20 जानेवारीच्या मुंबई आंदोलनाची मनोज जरांगे तयारी करत असून आज अंतरवली सराटीमध्ये 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेच्या ठिकाणी मनोज जरांगे यांनी ट्रॅक्टर चालवत आपण सज्ज असल्याचा सरकारला इशारा दिलाय. ( PC : ABP Majha File Photo)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिष्टमंडळाच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी सुचवलेल्या दुरुस्तीनुसार आज अध्यादेश निघण्याची शक्यता आहे, मात्र जरांगे यांनी अध्यादेशा अगोदर 54 लाख नोंदी सापडलेल्या समाजातील नागरिकांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्याची मागणी केली आहे. ( PC : ABP Majha File Photo)
मनोज जरांगे यांनी मुंबई आंदोलनाची घोषणा केली असून, यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. ( PC : ABP Majha File Photo)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला असून, यासाठी 20 जानेवारीला आंतरवाली सराटीमधून पायी दिंडी निघणार आहे.
दरम्यान, मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. ( PC : ABP Majha File Photo)
यावेळी वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठा आंदोलक उपस्थित राहणार आहेत. ( PC : ABP Majha File Photo)
सोबतच, आज मुंबई आंदोलनासाठी तयार करण्यात आलेले ट्रॅक्टर आणि एक ट्रक आंतरवालीमध्ये आणण्यात येणार आहे. ( PC : ABP Majha File Photo)
विशेष म्हणजे या आंदोलनात सर्वच जिल्ह्यातील मराठा आंदोलक सहभागी होणार आहे. त्यामुळे पोलीस देखील अलर्ट झाले आहेत. ( PC : ABP Majha File Photo)
कोणत्या गावातून किती आंदोलक जाणार, कोणते वाहनं घेऊन जाणार, यासाठी आर्थिक पुरवठा कुठून केला जाणार याची माहिती पोलिसांकडे जमा केली जात आहे. ( PC : ABP Majha File Photo)
सोबतच, ज्या मार्गाने ही दिंडी जाणार आहे, त्या भागातील पोलिसांकडून देखील आंदोलनाची दखल घेतली जाणार आहे, त्यानुसार वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी नियोजन करण्यात येत आहे. ( PC : ABP Majha File Photo)