Thane Fire : ठाणे: शिळफाटामध्ये चार गोदामांना भीषण आग, जीवितहानी नाही
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 May 2022 12:51 PM (IST)
1
ठाण्यातील शिळफाटा भागातील आचार गल्लीमध्ये रात्री 3 वाजण्याच्या सुमारास गोदामांना आग लागली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या भीषण आगीत 4 ते 5 गोदाम जळून खाक झाली आहेत. या आगीत कोणी जखमी झाले नाही.
3
ही गोदामे प्लास्टिक भंगाराची होती. यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या वस्तूंचा साठा होता.
4
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. ठाणे अग्निशमन दलाचे 7 तर नवी मुंबई अग्निशमन दलाचे 2 गाड्या आग विझवण्यासाठी वापरण्यात आल्या.
5
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही तासांचा अवधी लागला. सकाळपर्यंत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.
6
गोदामांना नेमकी आग कशामुळे लागली, याची माहिती समोर आली नाही. आगीचे नेमकं कारण समोर आले नाही.