Tulja Bhavani PHOTO : आई राजा उदो उदो... घरबसल्या घ्या तुळजाभवानी मातेचं दर्शन
हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला अत्यंत दिलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजच्या दिवशी घटस्थानपना करण्यात येते. नऊ दिवसांसाठी देवीची प्रतिष्ठापना केली जाते.
आज म्हणजेच, 7 ऑक्टोबरपासून नवरात्रीस प्रारंभ होत आहे. नवरात्रीनिमित्त अनेक घरात घटस्थापना करण्याचा कुळाचार आहे.
आई तुळजा भवानीच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक तुळजापुरात दाखल झाले आहेत.
भक्तांच्या गर्दीने तुळजापूर नगरी फुलून गेली आहे. घटस्थापनेचे औचित्य साधून राज्य शासनाने मंदिर खुले करण्याचा निर्णय घेतलाय.
भक्तांच्या गर्दीने तुळजापूर नगरी फुलून गेली आहे. घटस्थापनेचे औचित्य साधून राज्य शासनाने मंदिर खुले करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे देवी भक्तांसाठी हा दुग्धशर्करा योग आहे. विविध पद्धतीने भाविक देवीच्या चरणी आपली सेवा देत असतात. पुण्यातील नानासाहेब पाचुंदकर पाटील या भाविकाने तुळजाभवानीच्या मंदिरात आकर्षक अशा फुलांची सजावट केली आहे.
जवळपास एक हजार किलो झेंडू, गुलाब, ऑर्किड, ऍन्थुरियम अशा देशीविदेशी फुलांचा वापर कडून आई भवानीचे मंदिर सजविण्यात आले आहे. कलाकार कुमार शिंदे यांच्या मदतीने मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर साडेतीन शक्तिपीठांची प्रतिमा देखील साकारण्यात आली आहे.