Photo : भाजप आणि शिवसेनेच्या पाठोपाठ आता पवारांच्या भगव्याचीही आजपासून राजकारणात एन्ट्री!
abp majha web team
Updated at:
15 Oct 2021 05:59 PM (IST)
1
भाजप आणि शिवसेनेच्या पाठोपाठ आता पवारांच्या भगव्याचीही आजपासून राजकारणात एन्ट्री झालीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कर्जत - जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील शिवपट्टण किल्ल्यात आतापर्यंतचा सर्वात उंच भजवा ध्वज उभारलाय.
3
74 मिटर उंचीचा हा ध्वज हिंदु धर्मातील एकतेचे आणि समानतेचे प्रतिक म्हणून उभारतो आहोत असं रोहित पवारांनी म्हटलय.
4
त्याचबरोबर हा भगवा ध्वज उभारण्यास शरद पवारांचीही संमती होती असं रोहित पवारांनी म्हटलय.
5
1795 ला शिवपट्टण किल्ल्यात निजाम आणि मराठ्यांमधे लढाई होऊन मराठ्यांचा विजय झाला होता.
6
त्यानंतर फलटणच्या निंबाळकरांच्या ताब्यात हा किल्ला गेला आणि त्यांनी या किल्ल्याची डागडुजी केली.
7
मात्र गेली अनेक वर्ष हा किल्ला दुर्लक्षित होता. आता स्वराज्य ध्वजामुळे तो प्रकाशझोतात येणार आहे.