PHOTO : चंद्रभागा दुथडी भरुन वाहू लागली, वाळवंटातील मंदिरं पाण्याखाली जाऊ लागली
सध्या पुणे आणि सातारा जिल्ह्यात (Pune Satara Rains Live) सुरु असलेल्या पावसामुळे उजनी आणि वीर धरण (Ujani Veer Dam) 100 टक्के भरलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामुळं भीमा आणि नीरा नदीत (Chandrabhaga Neera River) मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली असून वाळवंटातील मंदिरात पाणी शिरू लागल्याने येथील देवांच्या मूर्ती हलविण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या लागून आलेल्या सुट्ट्या आणि पवित्र श्रावण महिना सुरु असल्याने रोज हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येत आहेत.
यातच विठ्ठल दर्शनापूर्वी चंद्रभागेच्या स्नानाला आलेल्या भाविकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
यामुळे चंद्रभागेत पाय धुवून आणि पात्रात नौकानयन करून भाविक आनंद घेत आहेत.
सध्या वीर धरणातून 33 हजार क्युसेक विसर्गाने नीरा नदीत तर 30 हजार क्युसेक विसर्गाने उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या धरणात येणार पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने पाणी सोडण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वीर धरणातील नीरा नदीत सोडलेले पाणी संगम येथे भीमा नदीत मिसळत असल्याने या दोन्ही धरणांचे पाणी थेट पंढरपूरमध्ये येत असते
. त्यामुळे यंदा ऑगस्ट महिन्यातच पंढरपूरकरांवर पुराचा धोका संभवण्याची शक्यता आहे.