टँकरचा धडकेत कंटेनरची एक बाजू कापत गेली, उलट्या दिशेने टँकरही पलटी,मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
01 Mar 2025 12:26 PM (IST)

1
मुंबई-गोवा महामार्गावर जानवली येथे पाण्याचा टँकर आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. जोरदार धडक दिल्याने कंटेनरचा एका बाजूचा पूर्ण भाग अक्षरश: कापत गेला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
टँकरला धक्का बसल्यानंतर तो मुंबईच्या दिशेने फिरून रस्त्यावर पलटी झाला. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली.

3
कंटेनर कापत गेल्याने महामार्गावर कंटेनर मधील भाजीचा खच पडला आहे.
4
या अपघातात सुदैवाने कुणालाही मोठी दुखापत झाली नसली तरी अपघातग्रस्त वाहने बाजूला करेपर्यंत महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.
5
वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने प्रवाशांना काही काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
6
प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले.