Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Makar Sankranti: नंदुरबारात रंगीबेरंगी पतंगांनी सजल्या बाजारपेठा
नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याचा सीमावर्ती भागात वसला असून गुजरात प्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उत्सव साजरा होत असला तरी पंधरा दिवसांपूर्वीच उत्सवाची तयारी केली जात असते.
नंदुरबारच्या बाजारपेठांमध्ये विविधरंगी पतंगांनी दुकाने सजली आहेत.
पंतगाचा दोरा तयार करण्याची ही लगबग सुरू झाली आहे.
अवघ्या पंधरा ते वीस दिवसावर संक्रात आली असून नंदुरबार जिल्ह्यात तयारीला वेग आला आहे.
विविध आकारातील आणि वेगवेगळ्या संदेश असलेल्या पतंगांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येत आहे.
मकरसंक्रांतीच्या दिवशी देशभरात पतंग उडवण्याची परंपरा आहे.
काही राज्यांमध्ये तर अख्खं कुटुंब मिळून पतंगांच्या खेळात रमलेलं असतं.
येणाऱ्या काळात पतंगाच्या बाजारपेठेत मोठ्या उलाढाली होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे
कागदी पतंगासह प्राण्यांच्या आकाराच्या विविध पतंग उपलबध आहेत. त्यांची किंमत 30 रुपयांपासून 500 रुपयापर्यंत आहे.
कागदाचे पारंपरिक पतंगही यावेळी विविध रंगसंगतीने आणि वेगवेळ्या आकाराने बाजारात दाखल झाले आहेत.