हायवेवर बंद पडलेली रुग्णवाहिका पाहून मुख्यमंत्र्यांना ताफा थांबवला, अन्...; मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलपणा
मुख्यमंत्री शिंदे गडचिरोली (Gadchiroli News) येथील नियोजित दौरा आटोपून ठाण्यातील (Thane News) निवासस्थानी परतत होते. पण वाटेतच मुख्यमंत्र्यांना एक रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडलेल्या अवस्थेत दिसली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचुनाभट्टी - कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली. मुख्यमंत्र्यांना तातडीनं ताफा थांबवला आणि स्वतः चौकशी केली.
रुग्णवाहिकेत रुग्ण असून त्याला तातडीनं उपचारासाठी नाशिकहून मुंबईला आणण्यात आल्याची माहिती मिळाली.
रुग्णाचं नाव धर्मा सोनवणे, पण मुंबईतील रुग्णालयात त्यांना दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला असल्यामुळे रुग्णाला पुन्हा नाशिकला नेलं जात असल्याचं नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, ठाणे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलास पवार यांना फोन लावला. रुग्णाची माहिती देत, तात्काळ रुग्णाला दाखल करुन त्याच्यावर उपचार सुरू करण्यास सांगितलं.
धर्मा सोनावणे यांचा अपघात झाला होता, त्यातच त्यांना हृदय विकाराचा सौम्य झटकाही आला होता. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या प्रमुखांच्या मदतीनं सर्वोतोपरी मदत पुरवण्यात आली आणि तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. एवढंच नाहीतर, धर्मा सोनावणे यांच्या उपचाराचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून केला जाईल, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून आपली अडचण समजून घेऊन तत्परतेनं मदत केलेली पाहुन धर्मा सोनवणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
दरम्यान, गडचिरोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री मुंबईत दाखल झाले होते.