चोहिकडे हिरवळ, धुक्याची चादर अन् फेसाळलेले धबधबे; महाराष्ट्राची चेरापुंजी असलेल्या आंबोलीत पर्यटकांची गर्दी
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
09 Jul 2023 12:23 PM (IST)

1
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत विकेंडची सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
वर्षा पर्यटनाला पर्यटकांची आंबोलीला नेहमीच पसंती असते.

3
त्यामुळे मोठ्या संख्येने राज्यासहित परराज्यातील पर्यटक आंबोलीत दाखल झाले आहेत.
4
आंबोलीत मुख्य धबधबा, कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी नदीचा उगम, महादेगड पॉइंट, नागरतास धबधबा याठिकाणी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.
5
पर्यटक ठिकठिकाणी थांबून पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.
6
सध्या आंबोलीत दाट धुक्याची चादर पसरली असून निसर्गाचं वेगळचं रूप पाहायला मिळत आहे.
7
स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद मिळाल्याचं सांगत पर्यटक निसर्ग सौंदर्य अनुभवत आहेत.