राज्यात पारा घसरला, धुळ्यात 8.4 अंश तापमानाची नोंद
राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. कमाल तापमानात मोठी घट झाल्यानं थंडी वाढली आहे. थंडी वाढल्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. कुलाब्यात यंदाच्या मौसमात पहिल्यांदाच किमान तापमान 20 अंशाच्याखाली गेलं आहे.
मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात देखील तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळं थंडीचा कडाका वाढला आहे.
धुळे शहरासह जिल्ह्याचे 10 अंशापर्यंत आलेलं तापमान आज 8.4 वर आलं आहे. त्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.
वाढत्या कडाक्याच्या थंडीमुळं सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. रात्रीच्या वेळी देखील रस्ते निर्मनुष्य होत आहेत.
परभणी जिल्ह्यातही कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. गेल्या आठवड्यात गायब झालेल्या थंडीचे पुनरागमन झालं आहे.
गेल्या चार दिवसांपासून परभणीत थंडीचा कडाका कायम आहे. सलग तीन दिवस परभणीचे तापमान हे 10 अंशावर होते. तर आज हे तापमान 11 अंशावर गेलं आहे.
थंडीमुळं ग्रामीण भागासह शहरात शेकोट्या पेटत असून नागरिक उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत.
मुंबईत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. कुलाब्यात देखील यंदाच्या मौसमात पहिल्यांदाच किमान तापमान 20 अंशाखाली गेलं आहे. उद्या देखील मुंबईतील किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केला आहे.