Photo : कोरोनाच्या सावटानंतर पहिल्यांदाच पंढरी गजबजली; चंद्रभागेत वारकरी भक्तीरसात चिंब
कोरोनाचे संकट कमी झाल्याने आज जया एकादशीला हजारो वारकरी दिंड्यांसह प्रदक्षिणा मार्गावर दिसून आले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटाळ मृदूंगाच्या जयघोषात पंढरी निनादली.
कोरोनाचे संकट कमी होत असताना आज हजारो भाविक दिंड्यांसह प्रदक्षिणा मार्गावर उतरल्याने हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ नृदूंगाच्या गजरात अवघी पंढरी नगरी दुमदूमून गेली आहे.
आज भल्या पहाटेपासून चंद्रभागेचे पवित्र स्नान करून परंपरेनुसार शेकडो दिंड्या प्रदक्षिणेसाठी रस्त्यावर उतरल्या.
एकादशी सोहळ्याला चंद्रभागा स्नान आणि प्रदक्षिणा मार्गावर विविध संतांचे अभंग म्हणत प्रदक्षिणा पूर्ण करीत असतात.
या सर्वच दिंड्या चौफळ्यातील गोपाळकृष्णाच्या मंदिरासमोर परंपरेनुसार अभंग झाल्यावर देवाकडे तोंड करून आरती म्हणत असतात.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे भाविकांना मर्यादा असल्याने अगदी मोजकेच भाविक वारीला पोचू शकले होते.
मात्र आता कोरोनाचे संकट कमी झाल्याने हजारोंच्या संख्येने भाविकांनी माघी यात्रेला हजेरी लावली आहे.
कोरोनाचे संकट कमी होत असले तरी महिला वारकऱ्यांच्या मनातील कोरोनाची भीती अजून कमी झालेली नाही. यातूनच या महिलांनी कोरोनावर गीत तयार करून त्या एकत्रित येत गाताना दिसत आहेत