International Kite Festival : बेळगावात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव, विविध प्रकारच्या पतंगानी आकाश सजलं
आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला बेळगावात प्रारंभ झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहोत्सवात देशातील तसेच परदेशातील दहापेक्षा अधिक पतंगबाज सहभागी झाले आहेत.
त्यामध्ये स्वित्झर्लंड, एस्टोनिया, इंग्लंड आणि अन्य देशातील पतंगबाजांचा समावेश आहे.
भारतातील पंचवीस राज्यातील पतंगबाज महोत्सवात सहभागी झाले आहेत.
बेळगावातील मालिनी सिटी इथे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार अभय पाटील यांनी या पतंग महोत्सवाचे आयोजन केले आहे.
कार्टून, पक्षी, प्राणी आदींच्या विविध प्रकारच्या पतंगानी आकाश सजून गेले आहे.
परदेशातील पतंगबाज या महोत्सवात आपल्या रंगीबेरंगी आणि विविध आकाराच्या पतंगासह सहभागी झाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेला पतंग देखील महोत्सवात पाहायला मिळाला.
कांतारा चित्रपटातील व्यक्तिरेखेचा पतंग, ऑक्टोपस, तिरंगा आणि विविध देशांच्या ध्वज असलेला पतंग, पतांगांची माळ पतंग महोत्सवाचे आकर्षण ठरले आहेत.