Chaitra Purnima 2022 : चैत्री पौर्णिमेच्या सोहळ्याला तुळजाभवानीच्या दर्शनाची ओढ; तुळजापुरात भाविकांचा मेळा
Tuljapur TuljaBhawani chaitra purnima : आज चैत्री पौर्णिमा आहे. चार दिवसाच्या सलग सुट्ट्यामुळे तुळजापूरात भाविकांनी गर्दी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्री पोर्णिमा सोहळा संपन्न होत आहे.
दोन वर्षानंतर चैत्री वारीचा खेटा पूर्ण करता आल्याने भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.
चैत्री पोर्णिमा सोहळ्यानिमित्त राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी आज श्रीतुळजाभवानीचे दर्शन घेतले.
चैत्री पोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पहाटे भाविकांनी भवानी तीर्थकुंडात स्नान करून थेट मंदिरात जाऊन देवीदर्शन घेऊन पौर्णिमा खेटा पूर्ण केला.
सकाळी सहा वाजता घाट होऊन देवीला दुग्धअभिषेक करण्यात आल्यानंतर वस्त्रोलंकार घालण्यात आले.
दुपारी एक ते चार दरम्यान देवीला असाह्य उष्णतेपासून सुटका मिळवी म्हणून पंख्याने वारा घालण्याचा विधी पार पडणार आहे
नंतर धुपारती करण्यात येऊन अंगारा काढण्यात आला.