Ashadhi Wari Photo : टाळ-मृदंगाच्या तालावर वारकरी भजनात दंग!
दोन वर्षांच्या कालावधीनंतर अखेर आषाढी वारी पालखी सोहळा सुरु झाला. 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सुरु झालेला मुक्काम आज भवानी पेठेतील मंदिरात आहे तर 20 जूनला सुरु झालेला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज निवडुंगा विठोबा मंदिरात असणार आहे.(photo:akki_paranjape_/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले....'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' चा गजर....करत पालखी पुण्यात आली.(photo:akki_paranjape_/ig)
संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dyaneshwar Maharaj) आणि संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या पालख्या पुण्यात मानाच्या मानल्या जातात. काल पालखीचे प्रस्थान पुण्यात झाले. (photo:akki_paranjape_/ig)
संत तुकारामांच्या पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरात आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील मंदिरात आहे. (photo:akki_paranjape_/ig)
या दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना प्रचंड गर्दी केली आहे. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात पुणेकर वारकऱ्यांसोबत दंग झालेले पाहायला मिळाले.(photo:akki_paranjape_/ig)
वेगवेगळ्या पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करताना पुणेकर दिसतायेत पुण्यातील सगळ्यात पेठ परिसरात अनेक ठिकाणी वारकऱ्यांचा विसावा आहे. तब्बल दोन वर्षांनंतर हा पालखी सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. (photo:akki_paranjape_/ig)
पुण्यात सध्या भक्तीमय वातावरण झाल्याचं पाहायला मिळतंय. (photo:akki_paranjape_/ig)