PHOTO: माघी गणेश जयंतीनिमित्त भक्तीला उधाण!
गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणेश जयंतीला माघी गणेशोत्सव, माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी असेही म्हणतात
हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी हा सण साजरा केला जातो.
कोरोना कालावधीनंतर यंदा गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे माघी गणेशोत्सव साजरा करण्याची गणेशभक्तांमध्ये क्रेझ वाढत आहे.
भाद्रपद गणपतीप्रमाणे माघी गणपतीची स्थापनाही दीड दिवस, पाच दिवस तर काही सार्वजनिक मंडळ 11 दिवसांसाठी करतात.
माघी गणेश जयंतीनिमित्त घरोघरी गणराय विराजमान झाले आहेत.
घरोघरी माघी गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत आहे.
घरी येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली.
गणेशमुर्ती आणताना जसा गणपती बाप्पाचा जयजयकार करतात तोच उत्साह श्रीगणेशाच्या विसर्जन मिरवणुकीपर्यंत कायम असतो.