PHOTO: धुक्यात हरवली मांजरा नदी; उगवतीच्या सूर्याची लालिमा पसरली, भन्नाट दृश्य
PHOTO: धुक्यात हरवली मांजरा नदी; उगवतीच्या सूर्याची लालिमा पसरली, भन्नाट दृश्य
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यभरात सध्या थंडीनं हुडहुडी भरलीय.
अनेक ठिकाणी धुकं पडत असल्यानं दृश्यमानता कमी झालेली पाहायला मिळते.
लातूर जिल्ह्यात देखील मागील काही दिवसांपासून सकाळच्या वेळी धुकं पडत आहे.
थंडीचा जोर देखील वाढला आहे.
संपूर्ण परिसरात सकाळच्या वेळी पांढऱ्याशुभ्र धुक्याची चादर पसरलेली पहावयास मिळते.
लातूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणजे मांजरा.
जिल्ह्यातून 145 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या नदीवर अकरा बंधारे बांधण्यात आले आहेत.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी आहे,
मांजरा नदीच्या दोन्ही तीरावर बहरलेली शेती धुक्यात हरवून गेली आहे. नागझरी, भातखेडा या नदी किनारी असणाऱ्या गावात सकाळच्या वेळीच दृश्ये फारच मनमोहक असतात धुक्यात हरवून गेलेला लातूर बीड रस्ता, नदीकाठची शेती, गावं, मंदिरं खासच दिसतात.