Palghar : अकरा वर्षाच्या चिमुकल्याचे 125 पर्यंतचे पाढे तोंडपाठ
पालघरच्या ग्रामीण भागातील शिक्षणाचा उडालेला बोजवारा अनेक वेळा उघडकीस झाला आहे. कधी शिक्षकांच्या कमतरतेमुळे तर कधी रोजगाराच्या होणाऱ्या स्थलांतरणांमुळे येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची दुरावस्था झालेली पाहायला मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र अशातही पाचवीत शिकणाऱ्या अकरा वर्षीय लाडक्या पालकर या विद्यार्थ्याने 125 पर्यंतचे पाढे तोंडपाठ केले आहेत. आणि याच लाडक्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होईल होतोय. त्याचं कौतुक केलं जात आहे.
लाडक्या लखमा पालकर याचं वय फक्त 11 इतके आहे. लाडक्या हा डहाणू तालुक्यातील पूर्वेस असलेल्या चरिकोठबी येथील खिंडीपाडा या जिल्हा परिषद येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतोय.
लाडक्याची अवघ्या दोन ते तीन वर्षांचा असतानाच त्याच्या आईचं निधन झालं होतं. वडील रोजगारासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत घराबाहेर असतात. अशात लाडक्याचा सांभाळ हा त्याच्या आजी कडूनच केला जातोय.
मात्र सध्या लाडक्या एका वेगळ्याच कारणाने जिल्ह्यात चर्चेत आला आहे. त्याने 125 पर्यंतचे पाढे तोंड पाठ केले आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झालाय.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पाचवीत शिक्षण घेणाऱ्या लाडक्याने नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र या परीक्षांसाठी गुणाकार भागाकारांसह गणित अगदी पक्क असायला हवं, असं त्याला त्याच्यात शाळेत शिक्षण देणाऱ्या अंकुश धडे या शिक्षकांनी सांगितलं.
मग काय लाडक्या जिथे जाईल तिथे फक्त पाढ्यांसोबतच. मागील वर्षी पर्यंत 50 च्या पाढ्यांपर्यंत पाढे पाठ असणारा लाडक्या आता अगदी दोन पासून ते 125 पर्यंत सहज पाढे बोलतोय तेही तोंडपाठ.
पहिलीपासूनच लाडक्या हुशार असल्याने शिक्षकांकडून नेहमीच त्याच कौतुक व्हायचं. त्यातच त्याला नवोदय आणि स्कॉलरशिप च्या परीक्षेची तयारी करण्याचं शिक्षकांकडून सांगण्यात आलं.
लाडक्या घरकाम असेल किंवा शाळेतल्या साफसफाईच काम तो नेहमी आपल्या खिशात पाढे लिहिलेलं कागद ठेवायचा. असं करत लाडक्याने हे 125 पर्यंतचे पाढे पाठ केले असून त्याचं शिक्षकांसह गावातील नागरिकांकडून ही कौतुक केला जात आहे.
कुटुंबाची आर्थिक हालाखीची असलेली परिस्थिती त्यातच पालघर सारख्या ग्रामीण भागात शिक्षणाचा उडालेला बोजवारा याचा कुठेही ओवापोह न करता लाडक्याने आपल्या मनाशी बांधलेली गाठ आणि केलेला निश्चय पूर्ण केला आहे .
लाडक्याप्रमाणेच आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीच रडगाणं मागे सोडून स्वतःच्या कर्तुत्वावर आणि जिद्दीवर आपलं शिक्षण पूर्ण करण्याची गरज निर्माण झाली आहे