Ambabai Mandir : घटस्थापनेला करवीर निवासिनी अंबाबाईची सिंहासनारुढ रुपात पूजा; पहिल्याच दिवशी अलोट गर्दी
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेल्या श्री करवीर निवासिनी मंदिरात मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदिशक्तीचा जागर करणाऱ्या या उत्सवाला मोठ्या मंगलमयी व उत्साही वातावरणात सुरुवात झाली.
सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने मंदिरात घटस्थापना झाली.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे व मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला.
दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची सिंहासनारूढ सालंकृत पूजा बांधण्यात आली.
नवरात्रोत्सवात प्रतिपदेला तिची सिंहासनारूढ पूजा बांधली जाते. सिंह हे शौर्य, सामर्थ्य, ऐश्वर्य व सत्तेचे प्रतीक आहे. श्री अंबाबाई ही विश्वाची सार्वभौम सत्ताधीश असल्याने घटस्थापनेला या रूपातील पूजा बांधली जाते.
दुसरीकडे, रविवार असल्याने नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी अंबाबाई दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.
सकाळपासूनच सगळ्या दर्शनरांगा भरून गेल्या होत्या.
भाविकांच्या सोयीसाठी दर्शन मंडप म्हणून यंदा प्रथमच शेतकरी संघाची इमारत वापरण्यात आली.