हसन मुश्रीफ ईडीच्या जाळ्यात, कार्यकर्त्यांचा घरासमोर आक्रोश
हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने तिसऱ्यांदा कारवाई केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी संतप्त झालेल्या एका कार्यकर्त्यांना आपलं डोकं फोडून घेतल्यानं एकच खळबळ उडाली.
मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
मुश्रीफ समर्थकांनी गेटसमोरच ठिय्या मांडला.
मुश्रीफांच्या निवासस्थानी सकाळी दूध देण्याचा प्रयत्न केला गेला.
समर्थकांची संख्या वाढत गेल्याने पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.
सलग कारवाई होत असल्याने मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा यांनी संताप व्यक्त केला.
सारखं येण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून संपवून टाका, अशी प्रतिक्रिया दिली.
भैया माने यांनीही कारवाईवरून टीकास्त्र सोडले.
दरम्यान, तिन्ही वेळी छापा टाकण्यासाठी आलेली ईडीची टीम सारखीच होती. मात्र, आज अधिकाऱ्यांची संख्या जास्त होती.
अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्या कुटुबीयांचे जबाब नोंदवून घेतले.
त्यांनी जबाब नोंदवण्यासाठी प्रिंटरही सोबत आणला होता.