Ambabai Mandir Rathotsava : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या रथोत्सवासाठी नव्याने बनवलेल्या रथाची चाचणी; 6 एप्रिलला होणार रथोत्सव
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या रथोत्सवासाठी यंदा नव्याने बनविलेल्या लाकडी रथाची चाचणी घेण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघाटी दरवाजा ते भवानी मंडप या मार्गावर सायंकाळी आठच्या सुमारास ही चाचणी घेण्यात आली.
गुरुवारी (6 एप्रिल) करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव होणार आहे.
रथोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
जोतिबा यात्रेसाठी येणाऱ्या बाहेर गावच्या भाविकांना अंबाबाईचे वैभव समजावे, यासाठी चैत्री यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रथोत्सव असतो.
यापूर्वी चांदीच्या रथातून हा रथोत्सव होत होता, परंतु त्या रथाचे लाकूड खराब झाल्याने यंदा नव्याने रथ बनवला आहे.
रथाची चाके आणि पाया तोच ठेवून रथाची वरील बाजू नव्याने करण्यात आली आहे. रथाच्या याच भागावर श्रीपूजक असतात.
त्यामुळे रथाची चाचणी घेताना देवस्थान कर्मचाऱ्यांनी तेवढे वजन पेलत रथ रथोत्सवाच्या मार्गावर नेला.
तीन महिन्यांच्या परिश्रमातून नक्षीकाम व नाजूक कलाकुसरीतून तयार झालेला हा भक्कम आणि देखणा आहे.
या रथाला लावलेल्या विद्युत रोषणाईने त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.