Maharashtra Karnataka Border Dispute : एका लोकप्रतिनिधीवर हल्ला होत असेल, तर मराठी भाषिकावर किती अत्याचार होत असेल; हसन मुश्रीफांकडून कर्नाटकच्या दडपशाहीचा निषेध
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला जाण्याचा निर्धार कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटक पोलिसांकडून कोगनोळी टोलनाक्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांन अडवण्यात आले.
यावेळी पोलिस आणि महाविकास आघाडीचे नेते आणि शिवभक्तांमध्ये चांगलीच झटापट झाली.
शांततेच्या मार्गाने आम्ही मोर्चे घेऊन जात असताना कर्नाटक पोलिसांकडून आमच्यावर लाठीहल्ला केल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले.
एका लोकप्रतिनिधी वर असा हल्ला होत असेल तर तेथील मराठी भाषिकावर किती अन्याय व अत्याचार होत असेल याचा विचार केला पाहिजे, असा संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
बेळगावमध्ये जाण्यास महाराष्ट्रातील नेत्यांना मज्जाव करण्यात आला आहे.
बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला अचानक परवानगी नाकारण्यात आली.
त्यामुळे मेळाव्यासाठी उभारलेले व्यासपीठ तसेच स्पीकरही काढून टाकण्याचा आदेश पोलिसांकडून देण्यात आला.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.
खासदार आणि महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांनाही बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
बेळगावचे जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी रविवारी आदेश काढला होता.