Maharashtra-Karnataka Border Dispute : कोल्हापूर शहरातील लाखभर भाविक सौंदत्ती यात्रेला, पण सीमावादाने जीव लागला टांगणीला
कानडी संघटनांनी महाराष्टाच्या वाहनांवर दगडफेक केल्याने कोल्हापूर जिल्ह्यातून सौंदत्ती यात्रेसाठी गेलेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकानडी संघटनांकडून राज्यातील वाहनांना बागेवाडी टोलनाक्यावर लक्ष्य केल्याने संताप पसरला आहे. कोल्हापूरमधून लाखभर भाविक सौंदत्ती यात्रेसाठी गेले आहेत.
सौंदत्ती यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना मालोजीराजे व सौ मधुरिमाराजे छत्रपती यांच्यामार्फत अखंडपणे गेली 19 वर्षे महाप्रसाद दिला जातो.
रेणुका देवीच्या यात्रेला कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ, शिवाजी पेठेसह शहरातील भाविक मोठ्या संख्येने सौंदत्तीला जातात.
रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त कोल्हापुरातून लाखो भाविक सौंदत्तीला गेले आहेत. त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी, अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
मराठी भाषिक यात्रेकरूंना संरक्षण द्यावे, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने केली आहे. या मागणीचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना देण्यात आले आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुका आणि सोलापूर, अक्कलकोटवर दावा केल्यानंतर सीमावादाला हिंसक वळण लागले आहे.
मंगळवारी कन्नडिंगांनी दगडफेक केल्यानंतर दोन्ही राज्यातील बससेवा कोल्हापूरमधून बंद करण्यात आली आहे.
24 तासानंतर आज सेवा पुन्हा सुरु झाली होती. मात्र, काही तासांमध्ये पुन्हा स्थगित करण्यात आली आहे.
राजेश क्षीरसागर फौंडेशनकडून सौंदत्ती गडावर रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा आणि अल्पोपहार वाटप करण्यात येत आहे.