Kolhapur Airport: कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार; वेळ कोणती असणार?
कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा 1 ऑक्टोबरपासून दररोज सुरू होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाडिक यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर सध्या आठवड्यातून तीन दिवसच विमानसेवा सुरू आहे.
ही सेवा दररोज सुरू व्हावी, अशी मागणी कोल्हापूरच्या उद्योगजगतातून होत होती; पण मुंबई विमानतळावर यासाठी स्लॉट मिळत नसल्याने त्यात अडचणी येत होत्या.
अखेर 1 ऑक्टोबरपासून स्टार एअर कंपनीने ही सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.
1ऑक्टोबरपासून सातही दिवस ही विमान सेवा सुरू राहील, अशी माहिती महाडिक यांनी दिली.
या विमानसेवेमुळे व्यापारी, उद्योजक, कलाकार, खेळाडू अशा सर्वांचीच मोठी सोय होणार आहे.
रोज सकाळी साडेनऊ वाजता मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने विमान झेपावेल. सकाळी साडेदहा वाजता ते कोल्हापुरात येईल.
त्यानंतर दहा वाजून पन्नास मिनिटांनी, कोल्हापूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेने उड्डाण करेल आणि अकरा वाजून पन्नास मिनिटांनी विमान मुंबई विमानतळावर उतरेल.
‘स्टार एअर’ या एअरलाईन्स कंपनीकडून ही सेवा सुरू होत आहे.