Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महानगरपालिकेचा सुवर्णमहोत्सव; वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा सत्कार
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडेयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर महानगरपालिकेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका कर्मचाऱ्याच्यावतीने 50 हजार शेणी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
ध्वजारोहणानंतर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दोन वर्षांच्या कोरोना काळात व शहरात आलेल्या महापुरात महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याचे सांगितले.
महापालिकेने यावर्षी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे प्रशासक म्हणाल्या.
चांगल्या गोष्टीसाठी एखादे पाऊल उचलल्यास नागरिक व सामाजिक संस्था स्वत:हून पुढे येत आपला सहभाग नोंदविता. हेच आपले यश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महापालिकेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता/वीरपिता/वीरपत्नी यांचा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते शाल, साडीचोळी, रोप व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
गुरुवारी शहरामध्ये पाच हजार वृक्षारोपण करण्यात आले. पंचगंगा घाट येथील गायकवाड पुतळा येथील महापालिकेच्या ओपन स्पेमध्ये प्रशासकडॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेता सुबोध भावे चित्रपटाच्या शुटींगसाठी पंचगंगा नदीकाठावर उपस्थित होते, त्यांना वृक्षारोपणाच्या उपक्रमाबद्दल माहिती कळताच त्यांनी स्वत: या उपक्रमात सहभागी होऊन वृक्षारोपण केले.
कसबा बावडा झूम प्रकल्प,पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रातील मुख्य रस्त्याच्या बाजूस, पुईखडी बायोगॅस प्रकल्पजवळ, कसबा बावडा कचरा प्रकल्प, कसबा बावडा फिल्टर हॉऊस या ठिकाणी महापालिकेच्या विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण केले.