Ambabai Mandir Navratri : श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील पहिला पालखी सोहळा

श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात काल पहिला पालखी सोहळा पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
देवीची पहिल्या माळेल्या सिंहासनारुढ रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली होती.

कोल्हापूरची अंबाबाई साडे तीन शक्तीपीठांपैकी एक आहे.
उत्सवाच्या पहिल्याच दिवशी 85 हजारांवर भाविकांनी देवीचे दर्शन घेतले
मंदिराला यंदा आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने शिखरांसोबत मंदिरावरील शिल्प सुद्धा उजळून निघाली आहेत.
पहिल्या दिवशीच्या पालखी सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
आजपासून मंदिरात भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येपासूनच नवरात्र मंडळांच्या वतीने मशाल ज्योती नेण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
परंपरेप्रमाणे 8 वाजता घटस्थापना खातेदार श्रीपूजक शेखर मुनिश्वर यांनी मुख्य पुरोहित किरण लाटकर यांच्याकडून करून घेतली.
सोमवारी पहाटे 4 वाजता, मंदिरात चोपदारांकडून घंटानाद करून विविध धार्मिक सोहळ्याची सुरुवात झाली.