Kolhapur News : तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बहिणींना ग्वाही
कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार मेळावा आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहिला भगिनींनी यावेळी मुख्यमंत्र्यांना राख्याही बांधल्या.
माझी लाडकी बहीण योजना ही राज्यात प्रचंड लोकप्रिय झाली असून संपूर्ण राज्यातून १.४० कोटी हून अधिक महिलांनी अर्ज भरले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
या योजनेतील ज्या महिला बाकी आहेत त्यांनाही लवकरच पैसे मिळतील असेही स्पष्ट केले.
या योजनेबद्दल विरोधकांनी अनेक संभ्रम पसरवले तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे निक्षून सांगितले.
ही योजना निवडणुकीपूरती नसून कायमस्वरूपी आहे, त्यासाठी 33 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या योजनेच्या रक्कमेत भविष्यात नक्की वाढ करू असेही सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून बँकांकडून परस्पर पैसे काढून घेतले जात असल्याच्या तक्रारी येत होत्या पण ते परस्पर काढले जाऊ नयेत यासाठी बँकांना स्पष्ट निर्देश दिले असल्याचे सांगितले.
बदलापुरात घडलेली घटना निंदनीय असून या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी न्यायालयात करू असे मुख्यमंत्री म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील खंडपीठाचा प्रश्न राज्याच्या मुख्य न्यायमूर्तींच्या कानावर घातला असून तेही यासाठी सकारात्मक आहेत लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. तर शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती दिली असून हा मार्ग सर्व सहमतीने पुढे नेण्यात येईल असे याप्रसंगी स्पष्ट केले