Karnataka Election: कर्नाटक विजयानंतर कोल्हापुरात काँग्रेसकडून साखर-पेढे वाटून आनंदोत्सव; सतेज पाटलांचा हलगीच्या तालावर ठेका

Kolhapur: आनंदोत्सव साजरा करताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, कर्नाटकमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आहे. 40 टक्के भ्रष्टाचाराचे सरकार म्हणून भाजप कार्यरत होते.

Continues below advertisement

satej patil kolhapur congress

Continues below advertisement
1/10
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर कोल्हापूर जिल्हा काँग्रेसकडून शिवाजी चौकात साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
2/10
यावेळी ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
3/10
छत्रपती शिवाजी महाराज तसेच काँग्रेस विजयाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
4/10
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत हलगी आणि घुमक्याच्या तालावर ठेका धरला.
5/10
सतेज पाटील म्हणाले की, कर्नाटकमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आहे. 40 टक्के भ्रष्टाचाराचे सरकार म्हणून भाजप कार्यरत होते.
Continues below advertisement
6/10
राहुल गांधी यांची भारत जोडोची संकल्पना खऱ्या अर्थाने सार्थ ठरल्याचे ते म्हणाले.
7/10
देशात दोन-तीन राज्ये सोडली तर भाजपकडे स्वबळाचे काहीही नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
8/10
सतेज पाटील यांच्याकडे सीमाभागातील कागवाड मतदारसंघाची जबाबदारी होती.
9/10
त्याठिकाणी काँग्रेसचे राजू अण्णा कागे हे 8,890 मतांनी विजयी झाले आहेत.
10/10
यावेळी आमदार जयश्री जाधव, सचिन चव्हाण, राजाराम गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Sponsored Links by Taboola