गौरी, पतंग, बुलेट, बावरी नटल्या अन् रस्त्यावर सुसाट धावल्या! कोल्हापुरात डौलदार म्हशींचा रोड शो
कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यातील विविध गावांमध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हशींचा रोड शो होत असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी म्हशीचे मालक आपल्या लाडक्या म्हशीला लग्नासाठी नटलेल्या नवरीप्रमाणे नटवत असतात.
कोल्हापूर शहरात म्हशींना त्यांच्या मालकांनी दिलेली नावे असंख्य कोल्हापूरकरांना तोंडपाठ आहेत.
कोल्हापूर शहरामध्ये टेक्सास, बुलेट, पतंग, बावरी, गौरी अशी असंख्य नावे म्हशींना दिलेली आढळतात.
म्हशींना पळवण्यासाठी यामाहा या गाडीचा हौस म्हणून वापर केला जातो.
यामाहा गाडीच्या मागून सुसाट या नटलेल्या म्हशी धावत असतात.
मालकाच्या इशाऱ्यावर म्हशींचा थाट पाहण्यासारखा असतो.
हा थाट पाहण्यसााठी शेकडो कोल्हापूरकर गर्दी करत असतात.
आमदार सतेज पाटील यांनाही बावड्यात म्हशीच्या मागून यामाहा गाडी रेस करण्याचा मोह आवरला नाही.
म्हशींना विविध रंगांनी रंगवून तसेच त्यांच्या शिंगांना मोरपंख बांधून सजवली जातात. काही म्हशींच्या पोटावर विविध नावेही लिहिली जातात.
मालकांचा तालावर उड्या घेणाऱ्या म्हशींचा रुबाब काही औरच असतो.
गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर शहरात म्हशींना सजवण्यापासून ते त्यांच्या अंगावर दागिनेही घातले जातात.
या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय भाष्यही केले जाते.