INS Mormugao: भारतीय नौदलात INS मोरमुगाओ दाखल

INS Mormugao: जवळपास 76 टक्के भारतीय बनावटीची असलेली INS Mormugao ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे.

Mormugao

1/10
INS Mormugao: जवळपास 76 टक्के भारतीय बनावटीची असलेली INS Mormugao ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे.
2/10
विशाखापट्टणम श्रेणीच्या चार विनाशिकांपैकी भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरो या स्वतःच्या संस्थेद्वारे संपूर्णपणे देशी बनावटीची रचना केलेल्या आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड(एमडीएल) ने बांधलेल्या दुसऱ्या युद्धनौकेचा समारंभाच्या माध्यमातून ताफ्यात औपचारिक समावेश करण्यात आला.
3/10
यावेळी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आयएनएस मुरगाव ही युद्धनौका संपूर्णपणे देशी बनावटीच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक शक्तिशाली युद्धनौकांपैकी एक असल्याचे सांगितले आणि यामुळे देशाच्या सागरी क्षमतांमध्ये वाढ होईल आणि राष्ट्रीय हिताचे रक्षण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
4/10
आयएनएस मुरगाव ही जगातील सर्वाधिक अत्याधुनिक क्षेपणास्त्र वाहक युद्धनौकांपैकी एक आहे, असे ते म्हणाले. यामध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त देशी बनावटीची सामग्री असलेली ही युद्धनौका म्हणजे युद्धनौकांची रचना आणि उत्पादन यामध्ये भारताने मिळवलेल्या प्राविण्याचा दाखला आहे आणि देशी बनावटीच्या संरक्षण उत्पादनांमध्ये वाढणाऱ्या क्षमतेचे झळाळते उदाहरण आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. आपल्या देशाच्या त्याचबरोबर आपल्या मित्र देशांच्या सध्याच्या आणि भविष्यातील गरजांची ही युद्धनौका पूर्तता करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
5/10
आयएनएस विशाखापट्टणम नंतर सर्वात अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञान असलेली आयएनएस मोरमुगाओ ही जागतिक स्तरावरील सर्वोत्तम विनाशक युद्धनौका आहे. मुंबईत माझगाव डॉकमध्ये ‘विशाखापट्टणम’ श्रेणीतील 4 नौकांची निर्मिती करण्याची घोषणा 2011 मध्ये करण्यात आली होती. यानंतर माझगाव डॉकमध्ये तयार झालेली ‘कोलकाता’ श्रेणीतील आयएनएस मोरमुगाओ ही दुसरी नौका आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस मोरमुगाओ ही भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे.
6/10
आयएनएस मोरमुगाओ ही आयएनएस विशाखापट्टणम सारखीच ब्राह्मोस, बराक क्षेपणास्त्र (मिसाईल), दोन प्रकारच्या तोफा, अत्याधुनिक एमएफस्टार रडार, हायटेक इलेक्ट्रिकल वॉरफेअर सिस्टिम (युद्धप्रणाली), स्वदेशी रॉकेट लाँचर, सागरी देखरेख रडारने सुसज्ज आहे.
7/10
त्याशिवाय, आकाशात मारा करणारे मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रांचा मारा या युद्धनौकेवरून करता येऊ शकतो. त्याशिवाय, हल्ल्याची आगाऊ सूचना देणारी यंत्रणादेखील आहे.
8/10
या नौकेतील 76 टक्के यंत्रणा भारतीय बनावटीची आहे. 'शौर्य, पराक्रम व विजयी भव' ही आयएनएस मोरमुगाओची युद्धघोषणा आहे. ‘डी ६७’ हा या नौकेचा क्रमांक आहे. 'प्रोत्साहित आणि मोहिम सज्ज' असे आयएनएस मोरमुगाओचे ब्रीदवाक्य आहे.
9/10
मोरमुगाओ नावाचे शहर गोव्यात समुद्रकिनारी आहे. या शहराला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. पण शहराचे मूळ नाव मोरमुगाओ आहे. मोरमुगाओ हे गोवा मुक्ती संघर्षाचे महत्त्वाचे केंद्र होते. याच कारणामुळे नव्या विनाशिकेला मोरमुगाओ हे नाव देऊन नौदलाच्या माध्यमातूम गोव्यात लोकशाहीसाठी झालेल्या लढ्याला सलामी देण्यात आली आहे.
10/10
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या नवनवीन युद्धनौकांची सातत्याने बांधणी करून आपल्या क्षमतेचा विस्तार केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी एमडीएलची प्रशंसा केली. देशी बनावटीच्या जहाजबांधणीमध्ये सरकारने सुरू केलेल्या उपक्रमांचा लाभ घेत आपल्या क्षमतांमध्ये वाढ करावी आणि भारताला देशी बनावटीच्या जहाज बांधणीचे केंद्र बनवण्यासाठी पुढे वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी एमडीएल आणि इतर जहाजबांधणी कंपन्यांना केले.
Sponsored Links by Taboola