Chitraratha on Rajpath : महाराष्ट्राच्या चित्ररथातून जैवविविधतेचे दर्शन!
आज आपल्या देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन आहे. या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. देशभरात हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज राजपथावर देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ देखील सहभागी झाला आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथातून जैवविविधतेचे दर्शन झाले. हा चित्ररथ जैवविविधता मानके विषयावर आहे.
महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा राज्यप्राणी 'शेकरू' 'ब्ल्यू मॉरमॉन' फुलपाखरू, मोर
तसेच विवीध अभयारण्यातील दुर्मिळ होत असलेल्या वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती अशी जैवविविधता दाखवणारा चित्ररथ आपल्याला राजपथावर होणाऱ्या संचलनात पाहायला मिळाला.
या चित्ररथाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील दिला आहे.
भारत हा देश जैवविविधता संपन्न असून महाराष्ट्रातील चार प्रमुख भागांमध्ये जैवविविधता दिसून येते.
युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीमध्ये महाराष्ट्रातील कास पठारचा समावेश आहे. तसेच राज्य शासनाने राज्यातील प्राणी, पक्षी तसेच अन्य जीवांसाठी राष्ट्रीय स्तरावर अभयारण्य राज्य शासनाने राखीव ठेवले आहे.
अनेक दुर्मिळ वनस्पती तसेच प्राण्यांच्या प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. हरियाल हे विशेष असलेले कबुतर राज्यपक्षी म्हणून घोषीत करण्यात आले आहे.
ब्ल्यू मॉरमॉन या विशेष प्रजातीची राज्य फुलपाखरू म्हणून घोषणा करणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. महाराष्ट्रातील हीच जैवविविधता चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.
या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची आहे. महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण जैव वारसा कवितेच्या व मधुर संगीताच्या रूपात मांडण्यात आलेला आहे.
दरवर्षी राजपथावर राज्यांच्या चित्ररथांना काही नियमांनूसार संधी दिली जाते. 2015 नुसार महाराष्ट्राला दोन वेळा सर्वोत्तम चित्ररथाचा किताब मिळाला आहे. 2015 साली पंढरीची वारी या संकल्पनेवर तर 2018 साली शिवराज्याभिषेक या संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ होता.