Veer Savarkar Airport : अंदमान-निकोबारला 710 कोटींची भेट, पोर्ट ब्लेअर विमानळाच्या नव्या टर्मिनलचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
Veer Savarkar International Airport : भारताचा केंद्रशासित प्रदेश अंदमान-निकोबारला 710 कोटींची भेट दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान मोदी यांनी आज पोर्ट ब्लेअरच्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे अंदमान-निकोबारवरील विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन केलं आहे.
सुमारे 710 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन एकात्मिक टर्मिनलमुळे केंद्रशासित प्रदेशाचा संपर्क वाढेल.
अंदाजे 40,800 चौरस मीटरच्या एकूण बिल्ट-अप क्षेत्रासह, नवीन टर्मिनल इमारत दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष प्रवाशांना हाताळण्यास सक्षम असेल.
पोर्ट ब्लेअर विमानतळावर 80 कोटी रुपये खर्चून दोन बोईंग-767-400 आणि दोन एअरबस-321 प्रकारच्या विमानांसाठी उपयुक्त असलेले ऍप्रनही बांधण्यात आले आहेत.
वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता एकावेळी 10 विमानांची पार्किंग करता येणार आहे.
विमानतळ टर्मिनलची स्थापत्य रचना समुद्र आणि बेटांवरील करणाऱ्या शंख-आकाराच्या संरचनेप्रमाणे आहे.
संपूर्ण टर्मिनलमध्ये दिवसाचे 12 तास 100 टक्के नैसर्गिक प्रकाश असेल, जो छतावर बसवलेल्या स्कायलाइट्समधून येईल. नवीन टर्मिनल इमारत 28 चेक-इन काउंटर, तीन प्रवासी बोर्डिंग ब्रिज आणि इतर सुविधांनी सुसज्ज आहे.