Himachal Pradesh Landslide : शिमल्यातील शिव मंदिर कोसळलं, 9 जणांचा मृ्त्यू; अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकलेले
मुसळधार पावसामुळे शिमल्यामध्ये भूस्खलन होऊन अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. (PC:PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही 25 ते 30 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना शिमल्याच्या समरहिल भागात घडली. (PC:PTI)
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिव मंदिराच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (PC:PTI)
श्रावणी सोमवार असल्याने मोठ्या संख्येने भाविक मंदिरात पोहोचले होते. दुसरीकडे, शिमल्याच्या लाल कोठीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (PC:PTI)
शिव मंदिराच्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत. परिसरात बचावकार्य सुरू आहे. (PC:PTI)
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सात वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. (PC:PTI)
मंदिरामध्ये भक्त पूजा करण्यासाठी पोहोचली होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली. (PC:PTI)
या परिसरात अद्यापही दरडी कोसळण्याच्या घटना सुरुच असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. स्थानिकांच्या मते, अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचं बोललं जात आहे. (PC:PTI)
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आणि भूस्खलनासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात बियास नदीला पूर आला आहे. (PC:PTI)
मीडिया रिपोर्टनुसार, हिमाचल प्रदेशात अतिवृष्टी आणि पुरामुळे 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या मंडी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर सोलन जिल्ह्यात सात मृत्यूची नोंद झाली आहे. (PC:PTI)